विष्णू वाघ यांची प्रकृती चिंताजनक

विष्णू वाघ यांची प्रकृती चिंताजनक

गोवा विधानसभेचे उपसभापती व ज्येष्ठ साहित्यिक विष्णू सूर्या वाघ यांच्यावर माहीमच्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक मात्र स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. उच्च रक्तदाबामुळे अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना गोव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने गुरुवारी रात्री एअर अ‍ॅम्ब्युलन्सने त्यांना माहीमच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होत असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *