मुंबईत जोरदार पावसामुळे वाहतुकीची कोंडी

मुंबईत जोरदार पावसामुळे वाहतुकीची कोंडी

मुंबईत पहाटेपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत, मुंबईत मागील २४ तासांत ७५.२६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पावसामुळे अनेक भागात वाहतुकीची कोंडी झाली आहे.

ठाणे, मुलुंड, पवईमध्येही मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. पश्चिम उपनगरांतही संततधार पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगरांत ५६.६२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दादर वरळी परळ भागातही पावसाने पहाटे पहाटे जोरदार हजेरी लावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *