आंबे तोडू दिले नाही म्हणून शेजाऱ्यांनी मुलीला जाळलं

आंबे तोडू दिले नाही म्हणून शेजाऱ्यांनी मुलीला जाळलं

आंबे तोडण्यापासून रोखल्यानं संतापलेल्या शेजाऱ्यांनी बागमालकाच्या मुलीला जीवंत जाळल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशमधील फतेहपूर इथं घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फतेहपूर जिल्ह्यातील खेशान या गावात शिवभूषण आणि त्यांचे कुटुंबीय राहत असून शिवभूषण यांच्या घराबाहेर आंब्याची झाडं आहेत. बुधवारी शिवभूषण यांच्या शेजारी राहणारे दोघं तरुण आंबे तोडत होते. शिवभूषण यांनी त्या तरुणांना आंबे रोखण्यापासून रोखलं. यामुळे त्यांच्या शेजारी राहणारे संतापले.

शनिवारी शिवभूषण हे शेतात कामासाठी गेले होते तर कुटुंबातील अन्य सदस्य लग्नासाठी बाहेर गेले होते. या दरम्यान शिवभूषण यांची १७ वर्षांची मुलगी घरात एकटीच होती. याचा फायदा शिवभूषण यांच्या शेजारी राहणारे चौघं जण जबरदस्तीनं त्यांच्या घरात शिरले. शिवभूषण यांच्या मुलीला बेदम मारहाण केली आणि यानंतर तिला जिवंत जाळून दिलं. या आगीत गंभीर भाजलेल्या त्या मुलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनं गावातील वातावरण तणावपूर्ण बनलं असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *