मरिनलाइन्स स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरला जोडणा-या मुख्य वायरचा वीज पुरवठा अचानक खंडित झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे जलदगती मार्गावरील वाहतूक पुर्ण ठप्प झाली होती.
ही घटना सायंकाळी ५.४५ च्या सुमारास घडली. चर्चगेट रेल्वे स्थानकात गाडय़ा अडकून पडल्या होत्या. सलग तीन दिवस सुट्टया असल्याने घरी लवकर पोहोचण्यासाठी कार्यालयातून निघालेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

