सेन्सेक्स २९३ अंशांनी उसळला

मुंबई शेअर बाजारातील निर्देशांक म्हणजे सेन्सेक्स शुक्रवारी २९३ अंशांनी उसळला. एनएसई निफ्टी निर्देशांक ८०अंशांनी चढला. बँकिंग, वित्त, धातू व वाहन कंपन्यांच्या समभागांची प्रामुख्याने जोरदार खरेदी झाल्याने ही तेजी आली होती.

त्याशिवाय भारतीय हवामान खात्याने आपल्या साप्ताहिक मान्सूनच्या अंदाजानुसार एकत्रित पाऊस सरासरीपेक्षा ३ टक्के जास्त झाल्याचे सांगितल्याने गुंतवणूकदारांचा उत्साह जोरदार होता. युरोपीय बाजारपेठा आणि आशियाई बाजारांतील तेजीमुळेही देशांतर्गत बाजारांत तेजी होती.

सेन्सेक्सची सुरुवात उच्च स्तरावरून झाली होती. २८,१५२.४० वर सेन्सेक्स बंद झाला. प्रमुख आर्थिक आकडेवारी औद्योगिक उत्पादनाची जूनमधील आकडेवारी जाहीर झाल्यामुळेही सेन्सेक्सची तेजी होती.

बँकिंग निर्देशांक सर्वाधिक म्हणजे २.०३ टक्क्यांनी वधारला. त्याखालोखाल धातू, सार्वजनिक उपक्रम, वाहने, पायाभूत सुविधा, ऊर्जा, भांडवली माल, एफएमसीजी, ग्राहकोपयोगी वस्तू यांचा क्रम होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *