संतप्त प्रवाशांचा बदलापूरमध्ये रेलरोको

मध्य रेल्वे मार्गावर वारंवार होणाऱ्या समस्येमुळे बेजार झालेल्या संतप्त प्रवाशांनी बदलापूर स्थानकावर रेलरोको केला.

रोजच्या ट्रेनला नेहमीच उशिर होत असल्याने प्रवाशांच्या संतापाच आज उद्रेक झाला. सकाळी ५ वाजल्यापासून स्थानकात प्रवाशांनी रेल रोको केला. त्यामुळे गेल्या तीन तासांपासून रेल्वेची दोन्ही बाजूंची वाहतूक विस्कळीत झालीये.

बदलापूर स्थानकातून एकही गाडी पुढे येत नाहीये. ऐन गर्दीच्या वेळेस ही घटना घडल्याने कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल होतायत. अनेक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी जमलीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *