ऍण्ड्रॉइड आणि त्यावरील ऍप्समुळे जगणे सुसह्य होत असले, तरी याचे काही तोटेही आहेत. स्मार्टफोनवर अधिक ऍप्स वापरणे किंवा अनावश्यक ऍप्स वापरणेही चुकीचे आहे. ऍण्ड्रॉइड ऍप्समध्ये फेरफार करून हे ऍप्स तुमच्या फोनमधील माहिती साठविण्यासाठी वापरता येतात. तुमचा ठावठिकाणा आणि वाहतुकीबद्दलची माहिती तुमच्या परवानगीशिवाय याद्वारे दुसऱ्याला मिळविता येते.
अल्गोरिदमचा वापर करून तुमच्या मोबाईलमधील सेंन्सर्सच्या आधारे सर्व माहिती ग्राफवर घेता येते.
मोबाईलचे ठिकाण, हालचाल आदी गोष्टींची माहिती ऍण्ड्रॉइड ऍप्समधून सहज मिळविता येते. ऍण्ड्रॉइड ऍप्समध्ये ही सुविधा त्यांच्या निर्मितीपासूनच असते.
ईशान्येकडील विद्यापीठाच्या संशोधकांनी एक ऍण्ड्रॉइड ऍप्स तयार केले असून, याद्वारे वाय-फाय किंवा जीपीएस अशा सुविधांचा वापर न करताही तुमच्यावर लक्षही ठेवता येते.
ज्या ऍप्सबाबत तुम्हाला माहिती आहे, ज्या ऍप्सशी तुम्ही परिचित आहात असेच ऍप्स इनस्टॉल करा. तुम्ही जर एखादे ऍप्स वापरत नसाल तर ते ऍप्स बॅकग्राउंडमध्ये “रनिंग‘ नसावे यासाठी काळजी घ्या.
जे ऍप्स तुम्ही क्वचित वापरता ते अनइनस्टॉल करा.
