मणिपूरमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक

मणिपूरमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक

मणिपूरमधील चंडेल जिल्ह्यात चार जून रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मणिपूरमधून तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एनएससीएन(के) संघटनेच्या दोन दहशतवाद्यांचा समावेश आहे.

एनएससीएन(के)चा प्रमुख खुमलो अबी अनल याला इंफाळ पश्चिम जिल्हा पोलीस अधिका-यांनी शोध मोहिमेदरम्यान एका सुपरमार्केटमधून ताब्यात घेतले. ११ जून रोजी त्याला अटक करण्यात आली.

तर तामेंगलोंग जिल्ह्यातील चिंगखुलोंग गावातून एनएससीएन(के)चा दुसरा दहशतवादी पम्मेई काकिलोंग उर्फ कलिंगला अटक करण्यात आली.

इंफाळ पूर्व जिल्ह्यातील कियामगेई गावातल इंफाळ पोलीस अधिकारी आणि आसाफ रायफल्सचे ४० जवानांनी केलेल्या संयुक्त कारवाईत कांग्लेईपाक कम्युनिस्ट पार्टीचा  मोहम्मद जहिद अली याला अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *