एकटाच हनीमूनला गेलेल्या पतीच्या मदतीस धावल्या सुषमा स्वराज

एकटाच हनीमूनला गेलेल्या पतीच्या मदतीस धावल्या सुषमा स्वराज

हनिमूनसाठी परदेशी जायची सर्व तयारी झाली होती. तिकीटही बुक झाली, व्हिसाही मिळाला. आणि ऐन वेळेला पत्नीचा पासपोर्ट हरवला. मग काय पत्नीला सोडून हे महाशय एकटेच हनिमूनसाठी निघून गेले. पण हनिमून एकट्याने करायचा कसा ? शेवटी फैजान पटेल याने आपल्या पत्नीच्या फोटोसहित काढलेला फोटो ट्विटरवर टाकत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची मदत मागितली.
ट्विटरवर नेहमी अॅक्टिव्ह असणा-या सुषमा स्वराज यांनी नेहमीप्रमाणे दखल घेत लगेच उत्तर दिलं. ‘तुमच्या पत्नीला माझ्याशी संपर्क साधायला सांगा. तुमच्यासोबत बाजूच्या सीटवर ती असेल याची खात्री देते’, असं ट्विट सुषमा स्वराज यांनी केलं. सुषमा स्वराज यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे डुप्लिकेट पासपोर्टही मिळवून दिला. सुषमा स्वराज यांच्या मदतीने एकमेकांची सोबत मिळालेल्या या दांपत्याने सुषमा स्वराज यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *