दुबई विमानतळावर बुधवारी (ता. 3) झालेल्या विमान अपघातानंतर येथील विमानतळ अद्यापही खुले झाले नसल्याने भारताने दुबईला जाणारी आणि येणारी सर्व उड्डाणे रद्द केली आहेत; अथवा शारजा आणि अबुधाबीकडे वळविली आहेत.
येथे अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी दुबई विमानतळ प्रशासनाने सध्या केवळ मोठ्या जेट विमानांनाच उतरण्याची परवानगी दिली आहे. दुबई ते भारत हा सर्वांत व्यग्र विमान मार्गांपैकी एक आहे. हे विमानतळ बंद झाल्याने हजारो प्रवाशांचे हाल झाले आहेत.