मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कार दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाला असून या अपघातात चारजण जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास झाला.
मळवली येथील देवले पुलाजवळ हा अपघात झाला. यामध्ये शिवाजीनगर पुणे येथील चार जणांचा मृत्यू झाला तर कार चालक गंभीर जखमी आहे.
भरधाव वेगातील कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी ही कार अति वेगात असल्याने दुभाजकाला धडकली.
मृत्यूचा महामार्ग बनलेल्या या द्रुतगती मार्गावरील मागील १५ दिवसातील हा तिसरा मोठा अपघात असून या तीन अपघातात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. हे तिनही अपघात अतिवेगामुळे झाले आहेत.
लोणावळा परिसरात मागील तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे रस्त्यावर स्पष्ट दिसत नसल्याने वाहनचालकांनी वाहने सावकाश चालवावी, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.