उत्तर प्रदेशातील माजी मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला असून, यापुढे माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी निवासस्थानाचा लाभ घेता येणार नसल्याचे आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आज सुनाविलेल्या आदेशात म्हटले आहे, की सध्या सरकारी बंगल्यांमध्ये राहत असलेल्या माजी मुख्यमंत्र्यांनी दोन महिन्यांत आपली निवासस्थाने खाली करावीत. उत्तर प्रदेशातील माजी सहा मुख्यमंत्री गेली अनेक वर्षे या सरकारी बंगल्यांमध्ये राहत आहेत. त्यांना बंगले खाली करण्याचे आदेश दिले आहेत.
सरकारी बंगल्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या माजी मुख्यमंत्र्यांमध्ये मुलायमसिंह यादव, मायावती, कल्याणसिंह, राजनाथसिंह, राम नरेश यादव, एनडी तिवारी यांचा समावेश आहे.