पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा कपात

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात या महिन्यात तिसऱ्यांदा कपात करण्यात आली असून, रविवारी पेट्रोलचे दर प्रतिलिटर 1.24 रुपये आणि डिझेलचे दर प्रतिलिटर 2.01 रुपयांनी कमी करण्यात आले.

जुलै महिन्यात झालेली ही तिसरी कपात आहे. याआधी 16 जुलैला पेट्रोलचे दर प्रतिलिटर 2.25 रुपयांनी आणि डिझेलचे दर प्रतिलिटर 42 पैशांनी कमी केले होते. 1 जुलैला पेट्रोल 89 पैसे आणि डिझेल 49 पैशांनी कमी केले होते. जुलैमध्ये कपात करण्याआधी 1 मेपासून चार वेळा दरवाढ करण्यात आली आहे. जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाचा भाव आणि अमेरिकी डॉलर व रुपयाच्या विनिमयाचा भाव याच्या आधारे पेट्रोल व डिझेलच्या दरातील चढउतार ठरतात. तेल कंपन्यांनी पेट्रोल 74 पैसे आणि डिझेल 1.30 रुपये दरकपात 16 एप्रिलला केली होती. ती वगळता 17 मार्चपासून दरवाढ झालेली दिसून आली आहे. 16 एप्रिल रोजी झालेली दरकपातवगळता 17 मार्चपासून पेट्रोल व डिझेल अनुक्रमे प्रतिलिटर 9.04 आणि 11.05 रुपये दरवाढ झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *