ससून रुग्णालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ डॉक्टरांच्या “मार्ड‘ या संघटनेने आज (सोमवार) सायंकाळी पाच वाजेपर्यंत काळ्या फिती बांधून काम करण्याचा निर्णय घेतला.
मार्डच्या डॉक्टरांनी यापूर्वी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. पण, पुन्हा हा निर्णय बदलत काळ्या फिती बांधून काम करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांकडून आज डीनला पुन्हा निवेदन देणार आहेत मारहाणीच्या वेळी तेथे हजर असलेल्या सुरक्षारक्षकांना निलंबित करावे, डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक मजल्यावर सशस्त्र सुरक्षारक्षक नेमावेत आणि रुग्णासोबत दोनच नातेवाईक सोडावेत आदी मागण्या “मार्ड‘ने केल्या आहेत.
दरम्यान, “मार्ड‘ने केलेल्या बहुतांश मागण्या मान्य झालेल्या असून काम बंद आंदोलन टाळण्यासाठी संघटनेसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली होती. त्यानुसार आंदोलन टळले आहे.