खर्डी स्थानकाजवळ सिग्नल बिघाडामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झालेली असतानाच आता कल्याणहून सीएसटीच्या दिशेने जाणारी लोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचा पुन्हा बोजवारा उडाला आहे.
खर्डीजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे कसा-याहून आसनगावपर्यंत वाहतूक ठप्प झाल्याने आठवडयाच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वे विस्कळीत झाली होती. ते कमी की काय म्हणून कल्याणच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ए वरून सीएसटीच्या दिशेने निघालेली लोकल रुळावरून घसरल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली. सुदैवाने लोकलचा स्पीड कमी असल्याने कोणतीही जीवितहानी वा कोणीही जखमी झालेले नाही.
दरम्यान या बिघाडामुळे कल्याण स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ व १ए वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला असून संबंधित रेल्वे कर्मचारी व अधिकारी घटनास्थळीदाखल झाले असून ही लोकल रुळावरुन बाजूला हटवण्याचे काम सुरू आहे.