भारताचा ४६२ धावांवर डाव घोषित

भारताचा ४६२ धावांवर डाव घोषित

बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने सहा बाद ४६२ धावांवर डाव घोषित केला. पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने पावसाचा व्यत्यय असतानाही मुरली विजय आणि शिखर धवन यांच्या दीडशतकांच्या जोरावर तिस-या दिवसअखेर ४६२ धावा केल्या.

चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरवात होण्यापूर्वीच (ओव्हर नाइट) कर्णधार विराट कोहलीने भारताचा पहिला डाव घोषित केला. सकाळी थेट बांगलादेशकडे फलंदाजी सोपवून भारतीय संघ गोलंदाजीसाठी मैदानावर उतरला.

प्रत्युत्तरात बांगलादेशच्या सलामीच्या जोडीने आक्रमक सुरवात केलेली असताना सहाव्या षटकात बांगलादेशला पहिला धक्का बसला. अश्विनच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक साहाने तमीम इक्बालला यष्टिचीत केले. तमीम इक्बालने २१ चेंडूत १९ धावा केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *