तोमर, लोणीकरांनंतर आता भुजबळ, बनावट पदवीप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल

तोमर, लोणीकरांनंतर आता भुजबळ, बनावट पदवीप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या पदवीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आला आहे. मुंबईतील चेंबूर पोलिसांकडे छगन भुजबळांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाच्या मुंबईतील नेत्या प्रिती मेनन यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना बनावट पदवी प्रकरणी अटक झाली. त्यानंतर महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर बनावट पदवीप्रकरणी अडचणीत आले आहेत. हे दोन्ही प्रकऱणं ताजी असताना आता महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांवर बनावट पदवी जोडल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

मुंबई एज्युकेशन ट्रस्टचे (MET) संकेतस्थळ व निवडणुकीचे प्रतिज्ञापत्रावर दिलेल्या शैक्षणिक माहितीमध्ये तफावत असल्याचं प्रिती मेनन यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत असल्याचा दावा केला आहे.

छगन भुजबळ यांनी मात्र प्रिती मेनन यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. शिवाय कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचं भुजबळांनी म्हटलं आहे. कोणतेही बनावट डिग्री घेतली नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *