गितांजली एक्स्प्रेसमधील बिघाडामुळे मध्य रेल्वे विस्कळीत

गितांजली एक्स्प्रेसमधील बिघाडामुळे मध्य रेल्वे विस्कळीत

मध्य रेल्वे पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. गितांजली एक्स्पेसमध्ये झालेल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूकीवर परिणाम झाला असून मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरु आहे. गितांजली एक्स्पेसमधील बिघाड दुरुस्त करून लोकल कल्याणच्या दिशेने पाठवण्यात आली आहे, मात्र लोकल उशिराने धावत आहेत. सकाळची वेळ असल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *