पाणुबडय़ांचा शोध घेणा-या ‘पी ८१’ या विमानांची खरेदी भारत अमेरिकेकडून करणार आहे. याबाबतचा करार भारताने अमेरिकेच्या संरक्षण खाते व बोईंग कंपनीशी केला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
भारताने यापूर्वी ‘पी-८१’ जातीची आठ विमाने अमेरिकेकडून खरेदी केली आहेत. आता आणखी चार विमाने भारताला हवी आहेत. ही विमाने भारताच्या ताफ्यात आल्यानंतर नौदलाची ताकद अधिक वाढणार आहे. ही विमाने पाणबुडीविरोधी लढण्यासाठी अधिक सुसज्ज आहेत. ही विमाने गुप्त योजना, टेहळणी आदींसाठी उपयुक्त ठरतील. ही विमाने रशियन ‘टीयू-१४२’ विमानांची जागा घेतील.
अमेरिकन नौदलाकडे ‘पी-८ए’ जातीचे विमान आहे. हे विमान बोईंग कंपनीने विकसित केले आहे. तर ‘पी-८१’ हे भारताला देण्यात येणार आहे. या विमानात दोन कॉकपिट असून छोटय़ा जागेतही ते उतरू शकते. या विमानात पाणसुरुंग बसवले आहेत. तसेच पाणबुडीच्या सोनार यंत्रणेचा शोध घेण्यासाठी खास यंत्रणा आहे. या विमानात क्षेपणास्त्र, बॉम्ब व सुरुंग बसवले आहेत.
तामिळनाडूच्या नौदल हवाई तळ रजाली येथे सध्या ‘पी ८१’ ही विमाने ठेवली आहेत. ही विमाने एका तासात ४५० मैल अंतर कापू शकतात. तसेच या विमानाची क्षमता ४५०० सागरी मैल अंतर कापण्याची आहे.