पुण्यातील डी.वाय.पाटील शैक्षणिक संस्थेवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. हा छापा कागपत्रांची तपासणी करण्यासाठी टाकण्यात आला असल्याचे समजत आहे. आयकर विभागाने बुधवारी सकाळी हा छापा टाकला.
शैक्षणीक क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणा-या डी.वाय.पाटील या शैक्षणिक संस्थेच्या पिंपरी-चिंचवड आणि कोल्हापुरातील संस्थेवर एकाचवेळी आयकर विभागाने छापा टाकला आहे. कर्मचा-यांनाही कार्यालयात जाण्यास मज्जाव घालण्यात आला आहे.
पिंपरीत २२ अधिका-यांनी डी वाय पाटील संस्थेच्या मेडिकल, डेन्टिस्ट, फार्मसी तसेच इंजिनीअरिंग अशा विविध कार्यालयांवर छापा टाकल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांच्यासोबत पोलीसही उपस्थित असल्याचे समजते.