येथे १९९८ मध्ये झालेल्या काळवीट शिकारी प्रकरणातून अभिनेता सलमान खान याची राजस्थान उच्च न्यायालयाने सोमवारी मुक्तता केली. या निर्णयाच्या विरोधात राजस्थान सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची घोषणा केली आहे.
राजस्थान उच्च न्यायालयाचे न्या. निर्मलजित कौर यांनी हा निकाल दिला. काळवीटाला लागलेली गोळी सलमान खानच्या परवानाप्राप्त बंदुकीतून मारलेली नव्हती. तसेच सलमान व त्याच्या सह कलाकारांनी वापरलेल्या वाहनांचा चालक बेपत्ता झाल्याचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.
काळवीट शिकार प्रकरणी मुख्य न्यायदंडाधिका-यांनी अभिनेता सलमानला अनुक्रमे एक व पाच वर्षाची शिक्षा ठोठावली होती. या निकालाला सलमानने सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.