मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण कार अपघातात 5 जण ठार

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कामशेतजवळ भिषण अपघात झाला आहे. पवना पोलीस चौकीजवळ झालेल्या भीषण कार अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी  पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव वेगात जात असताना कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की ५ जणांचा मृत्यु झाला असून १ जण गंभीर जखमी झाला आहे.
कामशेत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास MH 14 EU 7038 क्रमांकाची मारुती सुझुकी सियाज कार कामशेत हद्दीत भरधाव वेगात जात होती. यावेळी चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. अपघात तिघांचा जागीत तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. १ जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
अपघातात मृत पावलेले सर्व जण पुण्यातील बावधन येथील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं असल्याची माहिती कामशेत पोलिसांनी दिली आहे. मयत व जखमी साधारण २५ ते २८ वयोगटातील आहेतमृतांमध्ये आदित्य भांडारकर, यश शिरली या दोघांची ओळख पटली असून ते पुण्यातल्या बावधनचे आहेत. धायरीच्या सिंहगड कॉलेजचे हे सर्व विद्यार्थी असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. कामशेतचे पोलीस निरीक्षक आय.एस. पाटील पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *