विद्यार्थ्यांना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज जबरदस्त दिली ‘खूशखबर’

विद्यार्थ्यांना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज जबरदस्त दिली ‘खूशखबर’

दहावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज जबरदस्त ‘खूशखबर’ दिली. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना आता जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात परीक्षा देता येणार असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सप्टेंबरपासून कॉलेजलाही जाता येणार आहे. या निर्णयाचा फायदा दीड लाख विद्यार्थ्यांना होणार असून त्यांचे वर्ष वाचणार आहे. दरम्यान, पुढील वर्षीपासून गुणपत्रिकेवरील ‘नापास’ असा उल्लेख काढून टाकून त्याऐवजी ‘कौशल्यविकासासाठी’ असा उल्लेख करण्यात येणार आहे.
या फेरपरीक्षेसाठी १५ जूनपासून अर्ज स्वीकारले जाणार आहेत, तर १५ जुलैपासून प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर लेखी परीक्षा घेऊन ऑगस्टच्या तिसर्‍या आठवड्यात या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल.
वाढलेल्या निकालाची तपासणी करण्यासाठी परीक्षा पद्धतीत बदल करण्याची गरज आहे का, गुणांकन पद्धतीत बदल करण्याची गरज आहे का याबाबत अभ्यासगट स्थापन करणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *