उशिरामुळे परीक्षेतून विद्यार्थ्यांची हकालपट्टी

पिंपरीतील सिटी इंटरनॅशनल स्कूल येथे आलेल्या बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना केवळ दोन मिनिटाच्या उशिरामुळे परीक्षेस बसू दिले नाही. परीक्षा केंद्राचा पत्ता चुकीचा दिला असल्यामुळे यायला उशीर झाला असा,  निर्वाळा दिला तरीही त्यांची हकालपट्टी करण्यात आली. यामुळे आलेले विद्यार्थी निराश होऊन परत गेले.
ज्या विद्यार्थ्यांना 1 मे रोजी नीटची परीक्षा देता आली नाही अशा विद्यार्थ्यांना 24 जुलै रोजी पुन्हा ही परीक्षा देण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, पिंपरीतील सिटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये रविवारी (दि. 24) रोजी ही परीक्षा घेण्यात आली. या ठिकाणी परीक्षा केंद्राचा पत्ता चुकीचा दिल्यामुळे बीड, शिर्डी, औरंगाबाद, लातूर अशा बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राची शोधाशोध करायला वेळ लागला. केवळ दोन मिनिटाचा उशीर झाला तरीही त्यांना परीक्षेस बसण्यास मनाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *