शंभर मोटारी चोरणारा पोलिसांच्या जाळ्यात!

चित्रपटातून प्रेरित होऊन आलिशान मोटारी चोरणारा चोर तब्बल 100 मोटारी चोरल्यानंतर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

‘ओय लकी! लकी ओय!‘ या चित्रपटातून प्रेरित होऊन रॉबीन नावाचा तरुण मोटारी चोरत होता. उच्चभ्रू लोकांच्या सोसायटीत प्रवेश करून तेथील आलिशान मोटारींची पाहणी करून तो त्या चोरत होता. मॉर्निंग वॉकला निघालेल्या लोकांच्या घरात घुसून मोटारींच्या किल्ल्या शोधून मोटार चोरण्याची त्याची पद्धत होती. आतापर्यंत त्याने 100 पेक्षा अधिक मोटारी चोरल्याचे समोर आले आहे. मात्र बुधवारी अशीच एक मोटार चोरत असताना तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पश्‍चिम दिल्लीतील वाहनचोरी विरोधी पोलिस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून पोलिसांनी बीएमडब्ल्यू आणि टोयोटा फॉर्च्युनर ताब्यात घेतली आहे. गुन्हेगारी क्षेत्रात तो गेल्या 14 वर्षांपासून असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चोरी केलेल्या मोटारी तो एका नवाबाकडे देत होता. तो दिल्लीतील देवली परिसरात आपल्या गर्लफ्रेंडसोबत राहत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *