कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने मंगळवारी पीओपीच्या आणि रासायनिक रंग दिलेल्या गणेशमूर्तींवर पूर्ण निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी मातीच्या गणेशमूर्तींची बनवल्या जाणार आहेत.
गेल्या वर्षीचा हा निर्णय झाला होता. पण गेल्यावर्षी या निर्णयाची अंमलबजावणी करता आली नव्हती. मंडळाने काल बैठक घेवून यावर्षी या निर्णयाची चोख अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीसाठी कर्नाटकातील सर्व ‘स्टेक होल्डर्स’ उपस्थित होते.
वॉटर ॲक्ट १९७४ नुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याबाहेरून येणाऱ्या पीओपीच्या गणेशमूर्तींवर निर्बंध घातले जातील, तसेच पीओपीच्या गणेशमूर्तींची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचे लायसन्सही रद्द केले जाणार आहे. यासाठी पोलिसांचे सहकार्य घेतले जाणार आहे. तसेच मोठ्याप्रमाणावर जनजागृतीही केली जाणार आहे.