फ्रान्सच्या नीस शहरात ८४ जणांना चिरडून टाकणारा हल्लेखोर अस्थिर मनाचा होता. त्याचा दहशतवादाशी संबंध नव्हता, असे सरकारी वकील फ्रान्सिस मोलिन्स यांनी सांगितले. दरम्यान, हा हल्ला आपण घडवल्याचा दावा ‘इसिस’ने केला आहे. मोहम्मद हा आमचा सैनिक होता, असे संघटनेने सांगितले.
टय़ुनिशियातील मस्केन शहरात जन्मलेला मोहम्मद अनेक वर्षापासून फ्रान्समध्ये राहत होता.
नाईस शहराच्या बाहेरील एका अपार्टमेंटमध्ये तो राहत होता. तो मद्याच्या आहारी गेला होता, तसेच तो स्त्रीलंपटही होता. त्याच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती, असे त्याच्या शेजा-यांनी सांगितले.
त्याच्या वडिलांनी सांगितले की, मोहम्मदचा स्वभाव तापट होता. हिंसक झाल्यानंतर तो त्याच्या बाजूच्या वस्तूंची मोडतोड करत असे. तो मशीदतही जात नव्हता, असे त्याच्या वडिलांनी स्पष्ट केले.