लेप्टोची लागण

जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे लेप्टोस्पॉयरोसिसचा प्रादूर्भाव झाला आहे. गेल्या दोन दिवसांत  जिल्ह्यात एकूण 6 रुग्ण आढळले आहेत. या पार्श्‍वभूमीवर जि.प.च्या आरोग्य विभागाने सर्वत्र दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात लेप्टोचे रुग्ण सापडत आहेत. आतापर्यंत लेप्टोमुळे 10 पेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे. गेल्या दोन वर्षांत मात्र आरोग्य विभागाने घेतलेल्या योग्य काळजीमुळे बळी मात्र गेलेला नाही. मात्र, लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या वर्षी जिल्ह्यात जुलैमध्ये लेप्टोचा प्रादूर्भाव झाला आहे. गेल्या दोन दिवसांत जिल्हाभरात एकूण 6 रुग्ण सापडले असून त्यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

या रुग्णांमध्ये सूचित सुभाष वडपकर (35, पावस), श्रीपत कृष्णा बाईत (35 किरडवे, संगमेश्‍वर), स्वप्निल सदानंद चव्हाण (25 खेडशी, रत्नागिरी), नीता चंद्रकांत रहाटे (42, आंबेड बुद्रूक, संगमेश्‍वर), संजय अशोक गोंधळेकर (42, केतकी, चिपळूण), अर्जुन कृष्णा चौगुले (16, रत्नागिरी) यांचा समावेश आहे.

लेप्टोस्पॉयरोसिस हा रोग बाधीत प्राणी मुख्यत: उंदीर, डुक्कर, गाय, म्हैस, कुत्रा यांच्या लघवी वाटेने जंतू बाहेर पडतात. या प्राण्यांचे लघवीचे दूषित झालेले पाणी, माती यांचा मानवाच्या त्वचेशी संपर्क आल्यास (त्वचेवर जखम असल्यास हा रोग होतो) या रोगाचे निदान रक्त, लघवी प्रयोगशाळेमध्ये तपासून करता येते. आरोग्य विभागातर्फे सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजलेले असून आरोग्य शिक्षण, सर्वेक्षण इत्यादी कार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात आलेले आहे. तसेच जिल्ह्यामध्ये सर्व आरोग्य केंद्रे, जिल्हा शासकीय रुग्णालय या ठिकाणी या आजारावरील औषध साठा ठेवण्यात आलेला असल्याचे जि.प.च्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *