पालघरजवळ बस दरीत कोसळून दोन प्रवाशांचा मृत्यू

पालघरजवळ बस दरीत कोसळून दोन प्रवाशांचा मृत्यू

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर लग्झरी बस दरीत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. पालघरच्या मनोरजवळील साये गावाजवळ काल रात्री 11.30 च्या सुमारास हा अपघात झाला.

लक्ष्मी ट्रॅव्हल्सची ही लग्झरी बस मुंबईहून गुजरातला जात होती. चालकाचा ताबा सुटल्याने बस टेम्पोवर आदळली आणि दरीत कोसळली.

बस दरीत कोसळल्याने दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 18 जखमी प्रवाशांपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. किरकोळ जखमींना मनोर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. तर गंभीर जखमींना पालघर, मुंबई आणि गुजरातमध्ये हलवण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *