जिल्ह्यात अतिवृष्टी; धुवाँधार पाऊस

जिल्ह्यात अतिवृष्टी; धुवाँधार  पाऊस

पुण्यात पावसाची संततधार सुरुच आहे. पुण्यातल्या धरण क्षेत्रातही दमदार पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यानं मागील वर्षीची पातळी ओलांडली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांमध्ये गेल्या 2 दिवसांत 2 लाख दशलक्ष लीटर पाणीसाठा वाढला आहे.

गेल्या आठवड्यात धरणातील पाणीसाठ्यात घट झाली असून 15 ते 20 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक असल्याची चिंता पालकमंत्र्यांनी व्यक्त केली होती. आता मात्र आठ दिवसांच्या पावसामुळं गंगापूर धरणातील पाणीसाठा 3 टक्क्यांनी वाढलाय. त्यामुळं नाशिककरांचं पाणीसंकट तूर्तास टळलंय.. पावसाचा जोर बघता धरणातील पाणी पातळीत वाढ होईल असा अंदाज व्यक्त होतोय.

शिराळा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. चांदोली येथे अतिवृष्टी झाली. पावसाचा जोर वाढल्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून शिवारात घुसले आहे. यामुळे शिवारातील वस्ती गावात आली आहे. कोकरूड ते रेठरे बंधारा दुसर्‍यांदा पाण्याखाली गेला आहे. त्या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. वार्‍यामुळे कोकरूड येथील तानाजी बाळू घोडे यांच्या शेडवजा घरांची भिंत कोसळली आहे. अनेक ठिकाणी वार्‍यामुळे विजेचे खांब व झाडे पडली आहेत. यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. तालुक्यात कोकरूड, वारणावती, शिराळा, मांगले चरण येथे अतिवृष्टी झाली आहे.

शहरासह तालुक्यात गेल्या चार दिवसात  पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. या पावसामुळे अंतिम टप्प्यात आलेल्या पेरण्यांना गती येणार आहे. रविवारी सकाळ पासूनच तासगाव शहरासह तालुक्यातील बस्तवडे, आरवडे, वायफले, डोंगरसोनी, सावळज, यमगरवाडी, बिरणवाडी, अंजनी, वडगाव, लोकरेवाडी, सावर्डे, मणेराजुरी, खुजगाव , चिंचणी, लोढे, विसापूर, हातनूर, पेड़, येळावी, कवठेएकंद, बोरगाव, योगेवाड़ी, उपळावी यासह तालुक्याच्या सर्व

भागात कमी पावसाने दमदार  हजेरी लावली. द्राक्षबागाना हा पाऊस पोषक ठरत बागांच्या काड्या लवकर तयार होण्यासाठी मदत करणारा आहे. तालुक्यातील खरीपाच्या पेरण्या अंतिम टप्यात आल्या आहेत. काही ठिकाणी मका व अन्य कडधान्य टोकणी सुरु आहे. माळरानावर गवत उगवल्याने जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न थोडाफार कमी झाला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *