डॉक्टरला मारहाण केल्याप्रकऱणी बॉलीवूड गायक मिका सिंगला गुरुवारी दिल्ली पोलिसांनी अटक केली.
दिल्लीतील इंद्रापूरी पोलीस ठाण्यात यापूर्वी मिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी मिकाला नोटीस बजावली होती.
दिल्लीस्थित डॉक्टरने मिकाच्याविरोधात पोलिसांकडे गुन्हा दाखल केला होता. दिल्लीमध्ये मिका सिंगच्या कार्यक्रमावेळी मिकाने एका डॉक्टरच्या कानाखाली मारली होती. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता.

