‘हिजबुल’च्या कमांडरसह ३ अतिरेक्यांचा खात्मा

हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी बुरहान वानी याला कंठस्नान घालण्यात अखेर यश आले. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवादी आणि पोलिसाच झालेल्या चकमकीत बुरहानला लष्काराने यमसदनी पाठवले आहे. दीर्घ काळ चाललेल्या या चकमकीत बुरहानसोबत तिघा दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला यश आले आहे.
स्वतःचा आणि आपल्या साथीदारांचा फोटो सोशल मीडियावर टाकणारा बुरहान हा पहिला (कमांडर) दहशतवादी होता. बुरहानसोबत ज्या दहशतवाद्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यांचा वेगवेगळ्या चकमकीत मृत्यू झाला आहे. बुरहानचा खात्मा हा सुरक्षा यंत्रणांच्या दृष्टीने मोठं यश मानलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *