पालघरमध्ये रबर कंपनीला भीषण आग

पालघरमध्ये रबर कंपनीला भीषण आग

पाली-विक्रमगड मार्गावरील टीना रबर इंफ्रास्ट्रक्चर कंपनीला भीषण आग लागलीय.

या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाल्याचं वृत्त नाही. पण या आगीत कंपनीचं लाखो रुपयांचे नुकसान झालंय.

आज सकाळी ९ वाजता ही घटना घडली. विजेची ठिणगी पडल्यानं आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.

दरम्यान, या आगीची माहिती मिळाल्यानंतर तातडीनं अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्याचं काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *