चेंबुरमध्ये आरसीएफमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन तीन ठार

मुंबईच्या चेंबूर परिसरात असणा-या राष्ट्रीय रसायन आणि खते (आरसीएफ) कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत तीन कर्मचा-यांचा मृत्यू झाला. तीनजण जखमी आहेत. ही घटना शनिवारी संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

आरसीएफच्या परिसरात बॉयलरच्या दुरूस्तीचे काम सुरू असताना हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळते. अग्निशामन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्याला सुरूवात केली आहे.

जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *