‘आम आदमी पक्षा’चे नेते सोमनाथ भारती यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीनेच तक्रार केली आहे. पाच वर्षांपासून सोमनाथ भारती छळ करतात असल्याचा आरोप त्यांची पत्नी लिपिका मित्रा यांनी केला आहे. यासंदर्भात मित्रा यांनी महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे.
सोमनाथ भारती आणि त्यांच्या पत्नीचे संबंध 2010 पासून बिघडले आहेत. त्यानंतर त्यांच्या पत्नीने तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी महिला आयोगाने सोमनाथ भारतींविरोधात समन्स बजावलं आहे. आपली बाजू मांडण्यासाठी भारतींना 26 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
सोमनाथ भारती यांचं 2010 साली लिपिका मित्रा यांच्यासोबत लग्न झालं होतं. मात्र लग्नानंतर वर्षभरात आपल्यासोबत मारहाण केल्याचा आरोप लिपिका मित्रांनी केला आहे.
यापूर्वीही सोमनाथ भारतींचा पोलिसांसोबत वाद झाला होता. याशिवाय कालच बनावट पदवी प्रकरणी दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र सिंह तोमर यांनी अटक करण्यात आली होती. आणि आज पुन्हा एकदा आपचे दुसरे नेते सोमनाथ भारती अडचणीत सापडले आहेत.

