माहिममधील रामवाडी परिसरातील राजीव अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका महिलेना पोटच्या 8 वर्षीय मुलाची हत्या करुन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. स्वरा कासलकर असे या 42 वर्षीय महिलेचं नाव आहे.
माझं बाळ मोठं झाल्यावर त्याचं कसं होणार या चिंतेपायी मी आत्महत्या करत असल्याचं या महिलेनं सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलं आहे. महिलेच्या आणि मुलाच्या मृतदेहा जवळ सुरी, कोयता आणि सुसाईड नोट सापडली आहे. हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
मृत महिला ही नेव्हीमध्ये कामाला होती अशी माहिती मिळत आहे. पोलिसांनीही प्राथमिक अंदाजानुसार हा आत्महत्येचा प्रकार असल्याचं सांगितलं. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत.

