तूरडाळीची लागवड करणाऱ्यांना हेक्‍टरी अनुदान ?

तूरडाळी दर गगनाला भिडल्यानंतर आता सरकार यावर उपाय शोधण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात येत आहेत. त्यासाठीच आता यंदा तुरडाळीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदान देण्यात येणार असल्याचा विचार सरकारकडून करण्यात येत आहे. नाशिकमध्ये एका कार्यक्रमात आयोजित अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
नेहमी प्रमाणे राज्यात पावसाचे आगमन उशिरा झाल्याने तुरडाळीने 200 रूपयांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे तूरडाळीच्या दराने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. डाळींचे दर गगनाला भिडले आहेत. शिवाय भारतात 70 टक्के तूरडाळ आयात होते. त्यामुळे तूरडाळ लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हेक्‍टरी अनुदान देण्याचा विचारही सुरु केला आहे. याद्वारे डाळींच्या किंमती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न आहे. तसेच तूरडाळीचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, पावसाने आणखी काही दिवस राज्यात येण्यास उशिर केला तर महागाईचे संकट आणखी वाढणार असल्याचे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *