सलमानविरोधात सलीम यांचा माफीनामा

बलात्कारपीडीत महिलांसंदर्भात केलेल्या संतापजनक वक्तव्यावर बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने माफी मागावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.सोशल मी डियावरुन सलमानवर जोरदार टीका करण्यात येत आहे.

एखादा व्यक्ती इतक्या अनौपचारिक पद्धतीने असे वक्तव्य कसे करू शकतो? मला या अभिनेत्याची मानसिकता समजली, अशा प्रतिक्रिया राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी सदस्य शमिना शफीक यांनी व्यक्त केली आहे.

बलात्कार म्हणजे महिलेच्या स्वाभिमानाचा अवमान आहे. सलमानने केलेली ही तुलना अयोग्य आहे. सलमान यामध्ये दोषी आहे. त्याने त्याच्या वक्तव्यावर माफी मागायलाच हवी, असे भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या शायना एनसीयांनी म्हटले आहे.

सलीम खान यांचा माफीनामा

सलमान खानच्या विधानावर वाद झाल्याने त्याचे वडील आणि लेखक सलीम खान यांनी माफी मागितली आहे. सलमानने त्याच्या कामाबाबत जे उदाहरण दिलं, ते चुकीचेच आहे आणि त्यात कोणतीही शंका नाही. पण त्याचा उद्देश चुकीचा नव्हता, असे सलीम खान यांनी ट्विटरवर लिहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *