अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या नातू वीर पाहारिया यांच्यातील डेटींगची चर्चा मीडियात मागील बऱ्याच दिवसापासून सुरू आहे. आता तर या दोघांचा साखरपुडा झाल्याच्या बातम्या पुढे येत आहेत.
काही दिवसापूर्वी या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर त्यांच्यातील नात्याबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यातच काही दिवसांपूर्वी सैराटच्या स्क्रिनिंगसाठी सारा अली होती. त्यावेळी तिच्या बोटात दिसलेल्या रिंगने साराच्या एंगेजमेंटची चर्चा सुरू झाली. करण जोहरच्या आगामी चित्रपटातून सारा अली बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.