कर्नाटकातील अपघातात आठ शालेय विद्यार्थी ठार

मंगलूरपासून सुमारे 90 किमी अंतरावर असलेल्या कुंदपुर गावाजवळ शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका व्हॅनला बसने समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात आठ विद्यार्थी ठार झाले, तर अन्य नऊ विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले. व्हॅनमध्ये स्थानिक डॉन बास्को शाळेचे 17 विद्यार्थी, एक शिक्षिका आणि एक चालक असे एकूण 19 जण होते. खासगी प्रवासी बस बायंदुरहून कुंदपुरकडे येत होती. तर व्हॅन समोरून उलट्या दिशेने येत होती. त्यावेळी त्यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर अन्य सहा जण रुग्णालयात नेले जात असताना मरण पावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *