सूर्यवंशी यास रंगेहाथ अटक

सूर्यवंशी यास रंगेहाथ अटक

खोपोली नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी पदावर कार्यरत भास्करराव शंकरराव सूर्यवंशी यास बुधवारी खोपोली रेल्वे स्थानकात तब्बल अडीच लाखांची लाच घेताना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष पथकाने रंगेहाथ अटक केली.

एका शिक्षकाला बी.एड्. पदवी संपादन केल्यावर संबंधित वेतनश्रेणीवर कायम करणे, पाचव्या वेतन आयोगानुसार अदा करायच्या रकमेतील फरक देण्याकरिता सूर्यवंशी याने अडीच लाखांची मागणी केली होती.

याबाबत तक्रारदारांनी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. यानुसार बुधवारी सापळा रचून सूर्यवंशी यास रंगेहाथ अटक करण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक सुनील कलगुटकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *