सलमान खानने त्याच्या चाहत्यांना दिली धमकी

सलमान खानने त्याच्या चाहत्यांना दिली धमकी

बॉलिवूडमधील अमिर, शाहरूख आणि सलमान या तीन खानमध्ये होणारे वाद नेहमीचं चर्चेचा विषय ठरतात. पण भाईजान सलमानने अमिर खान आणि शाहरूख खान आपले मित्र असल्याचे ट्विटरवर सांगितले आहे.

‘आमच्यात कोण श्रेष्ठ, कोण पहिला, कोण कोणाबद्दल काय बोलला, याबद्दल उलटसुलट विधाने करुन आमच्यात स्पर्धा लावण्याचा प्रयत्न करु नका.  चाहत्यांनी आमच्यात नंबर गेम खेळणे बंद करावे, अन्यथा मी स्वत: ट्विटरवरून निघून जाईन’, अशी धमकी सलमानने त्याच्या चाहत्यांना दिली आहे.

सलमानने आपल्या चाहत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. “चाहत्यांनी नंबर गेम खेळणे बंद करावे, शाहरूख आणि अमिर हे दोघे माझे मित्र आहेत. “Bhad mein gaya No 1,2,3. Samjhe kya?.”, अशी पोस्ट सलमानने ट्विटरवर केली आहे.

”मी ट्विटरवर फार कमी वेळा येेतो. हे असेच चालू राहिले तर अखेर मी ट्विटरवरून निघून जाईन, असेही सलमानने ट्विटरवर सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *