डंपरची लोकलला धडक, हार्बर विस्कळीत

हार्बर मार्गावर पनवेल ते खांदेश्वर दरम्यान गुरुवारी दुपारी एक वाजता एका डंपरने लोकल रेल्वेला धडक दिली. धडकेमुळे डंपरचा पुढील काही भाग लोकलच्या डब्यावर आदळल्यामुळे चेपला गेला. सुदैवाने या अपघातात कोणाही जखमी झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, खांदेश्वर ते पनवेल दरम्यान किमी नं ४६/३ जवळ एका तलावाचे काम चालू आहे. त्याठिकाणी एक डंपर खडी टाकुन डंपर मागे – पुढे करीत असताना डंपर थोडा पुढे गेला. त्याच दरम्यान पनवेल- ठाणे लोकल आल्याने डंपर लोकलवर जाऊन धडकला. त्यानंतर डंपरचा चालक गाडी तिथेच सोडून पळून गेला.

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या साह्याने डंपर घटनास्थळावरून हटविण्यात आल्यानंतर संबंधित लोकल पुढे मार्गस्थ झाली. या मार्गावरील रेल्वे वाहतूक सु

रळीत असल्याचे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी सांगितले.

घटनास्थळी रेल्वे पोलीस, पनवेल जीआरपीचे अधिकारी व कर्मचारी अधिक चौकशी करत आहेत.

या अपघातामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *