सिंहगड मार्गावरील वडगाव बुद्रुक येथील पुलावर डांबराच्या डंपरने कार, प्रवासी बस, मोटरसायकल आणि रिक्षा अशा चार वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात सात जण ठार झाल्याचे वृत्त आहे.
डांबराच्या डंपर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने डंपरने कार, प्रवासी बस, मोटरसायकल आणि रिक्षा अशा चार वाहनांना धडक दिली. डंपरच्या जोरदार धडकेमुळे या अपघातामधील मोटर कार चक्क पुलावरुन खाली कोसळली.
या अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
