भारतीय हॉकी संघाने रचला इतिहास

भारतीय हॉकी संघाने चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच प्रवेश मिळवून भारताने नवा इतिहास रचला आहे.

अंतिम स्पर्धेतील प्रवेशासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा महत्त्वाचा सामना गुरुवारी झाला. अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे किंवा बरोबरीत सोडविणे आवश्‍यक होते. मात्र गुरुवारी रात्री पावणे एकच्या सुमारास झालेल्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 4-2 ने पराभूत केलं. या पराभवामुळे भारताला ब्रिटन-बेल्जियम सामन्याकडे डोळे लावून बसावे लागले. तो सामना बरोबरीत सुटल्याने भारत अंतिम सामन्यात पोचला आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतीय संघ आतापर्यंत एकदाही अंतिम सामन्यात पोहोचलेला नाही. 1982 साली नेदरलॅंडमध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने ब्रॉंझ पदक पटकावलं होतं. ही भारताची या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामिगरी होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *