हरियाणातील शिक्षकांनी यापुढे जीन्स पँट घालून शाळेची पायरी चढू नये, असा तुघलकी निर्णय हरियाणातील भाजपा सरकारने घेतला आहे. तसे आदेशही शिक्षण संचालकांकडून जारी करण्यात आले आहेत.
या निर्णयाविरोधात शिक्षक वर्गात संतापाची लाट उसळली असून ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
हरियाणातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील बहुतांश शिक्षक हे शाळेत जीन्स पँट घालून येत असल्याचे समोर आले होते. शिक्षण संचालक कार्यालयात येणारे शिक्षक सर्रास जीन्स पँट घालून येतात, असे सरकारचे म्हणणे आहे.