डेन्मार्कच्या महिलेवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी तीस हजारी न्यायालयाने पाचही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने या आरोपींना सामूहिक बलात्कार, चोरी आणि अपहरणाच्या आरोपाखाली दोषी ठरवले होते. महेंद्र उर्फ गंजा, मोहम्मद राजा, राजू, अर्जून आणि राजू चक्का अशी आरोपींची नावे आहेत. 14 जानेवारी 2014 मध्ये चाकूचा धाक दाखवत डेन्मार्क महिलेवर बलात्कार करुन तिला लूटण्याचा प्रकार घडला होता.
नवी दिल्ली रेल्वेस्थानकाजवळ जानेवारी 2014 मध्ये 52 वर्षांच्या डेन्मार्क महिला पर्यटकाने तिच्या हॉटेलचा पत्ता विचारला असता नऊ जणांनी चाकूच्या धाकाने तिला निर्मनुष्य जागेत नेले होते. तेथे तिच्याकडील ऐवज लुटून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. या खटल्यातील एक आरोपी श्यामलाल (वय 56) याचा यावर्षी फेब्रुवारीमध्ये तिहार कारागृहात मृत्यू झाला होता. तर आणखी तीन आरोपी गुन्हा घडला तेव्हा अल्पवयीन होते.