पाणी हेच जीवन आहे. पाण्याशिवाय कोणीही जिवंत राहू शकत नाही. पण जर आपल्याला 24 तास पाण्यावर तरंगत राहायचे आहे असे म्हंटले तर…? जगात असेही एक ठिकाण आहे, एक गाव आहे जे संपूर्णपणे पाण्यावर तरंगलेले आहे.
चीनमध्ये निंगडे सिटीतील एक वस्ती आहे जी संपूर्णपणे समुद्रावर तरंगत असलेली वस्ती आहे. 1300 वर्ष जुनी असलेली ही वस्ती संपूर्ण म्हणजे दिवसातील 24 तास पाण्यावर तरंगलेली असते. सद्य स्थितीत या वस्तीत साधारणत: 8500 लोक वास्तव्य करत आहेत. हे सर्व लोक मासेमारी करणारे लोक असून त्यांना टांका असे म्हंटले जाते. साधारणत: 100 वर्षांपूर्वी टांका जातीचे लोक अस्तित्वात होते जे त्याकाळातील तेथील शासकांच्या जाचाला कंटाळून ती वस्ती सोडून समुद्रकाठी असलेल्या या जागेत वस्ती करून राहू लागले. आजही त्या लोकांचे वंशज असलेले लोक याठिकाणी त्यांनी समुद्रातील नावांमध्ये तयार केलेल्या परंपरागत घरांमध्ये राहतात. ही मासेमारी करणाऱ्या लोकांची वस्ती फुजियान राज्यातील दक्षिण पूर्व च्या निंगडे सिटीजवळील समुद्रात राहणारी वस्ती आहे. या लोकांना जिप्सीज ऑफ द सी असेही संबोधले जाते. हे लोक किनाऱ्यावरही येत नाहीत आणि समुद्राबाहेरील लोकांशी कोणते संबंधही प्रस्थापित करत नाहीत. जगातील हे एकमेव असे गाव आहे जे पूर्णपणे समुद्रात वस्ती करून राहाते.
समुद्रावर तरंगणारे एक गाव
