इंडोनेशियास पुन्हा शक्तिशाली भूकंपाचा धक्का

इंडोनेशियाच्या लोंबूक या बेटास आज (गुरुवार) भूकंपाचा धक्का बसल्याचे निष्पन्न झाले. यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नसून सुनामीचा इशाराही देण्यात आलेला नाही.

या शक्तिशाली भूकंपाची तीव्रता 6.2 रिश्‍टर स्केल इतकी होती. इंडोनेशियामधील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या बाली बेटावरील पर्यटकांनाही या भूकंपामुळे धक्का बसला. या भूकंपाचे धक्के तीन ते चार सेकंदांपर्यंत जाणवत राहिले. भूकंपामुळे भयभीत झालेले नागरिक तातडीने घराबाहेर पडले. इंडोनेशियास कालही (बुधवार) शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला होता. इंडोनेशियातील उत्तर मालुकू प्रांताला काल पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला. भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता 6.4रिश्टर स्केल इतकी होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *