पत्नीचा रंग काळा असल्याने तिला जिवंत जाळण्यात आल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (गुरुवार) दिली.
सोमेरा बिबी (वय 22) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. सोमेरा यांनी मृत्युपुर्व दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, ‘माझा रंग काळा असल्यामुळे कुटुंबीयांकडून त्रास दिला जात होता. पतीला गोऱ्या रंगाची पत्नी हवी होती. तीन जून रोजी पती, तीन दीर व सासूने एका खोलीमध्ये कोंडून अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यावेळी शेजाऱ्यांनी माझ्या दोन वर्षाच्या मुलाला पळविल्याने तो बचावला.‘
‘सोमेरा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचे निधन झाले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे,‘ असे पोलिसांनी सांगितले.